Homeप्रदेशमविआ रिंग मास्टरच्या दबावात आहे का.??

मविआ रिंग मास्टरच्या दबावात आहे का.??

प्रकाश आंबेडकर हे देशातील एक ब्रॅंड आहेत, ते आंबेडकर आहेत, महाराष्ट्रातच नव्हे तर देशात त्यांच्या नावावर मते मिळू शकतात. म्हणून ते मविआ सोबतं असावे असे आम्हाला मनोमन वाटतेय…. इति शिवसेने नेते संजय राऊत ….!!

प्रकाश आंबेडकर साहेब यांनी मविआ सोबतं यावं आणि इथल्या विषमतावादी भाजपला पराभूत करावे अशी कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची इच्छा आहे आणि म्हणून राहूल गांधी यांनी मला आदेश देऊन वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील संविधान बचाव सभेत पाठविले आहे. कॉंग्रेस पक्षाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतं युती करायची आहे, हा संदेश देण्यासाठी मी मुंबई मधील वंचित बहुजन आघाडीच्या सभेला हजेरी लावली आहे…. इति नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कॉंग्रेस….!!

प्रकाश आंबेडकर मविआ सोबतं असणे किती गरजेचे आहे हे मी स्वतः दिल्लीतील कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना सांगितले आहे, माझ्या पक्षाच्या वतीने आणि मी स्वतः प्रकाश आंबेडकर यांना मविआ सोबतं घेतले पाहिजे या विचाराचे आहोत… इति शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…!!

प्रकाश आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांच्या अंगात बाबासाहेब आंबेडकरांचे रक्त आहे, ते संविधान वाचविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे नेते आहेत आणि ते मविआ सोबतं निश्चितपणे असतील यात शंका घेण्याचे काहीही कारण नाही… इति. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष….!!

मविआ मधील कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्वच नेते वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबतं मविआ मध्ये असावे, त्याशिवाय भाजपला पराभूत करता येत नाही हे मान्य करतात आणि मिडिया मध्ये तशी कबुली सुद्धा देतात….!!

मविआ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश व्हावा मविआ मजबूत व्हावी आणि महाराष्ट्रात भाजपा,आरएसएसचे पानिपत करावे ही महाराष्ट्रातील तमाम सेक्युलर,संविधानवादी जनतेची इच्छा आहे….!!

१ सप्टेबंर २०२३ ला वंचित बहुजन आघाडी ने मविआ मध्ये सामावून घ्यावे आणि आपणं युती करु म्हणून कॉंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून युतीसाठी पुढाकार घेतला, त्याला आता ७ महिने होतं आहेत…!!
वंचित बहुजन आघाडीने रितसर पत्र लिहून आघाडी साठी सुरुवात केली, त्यावर अनेक कोलांट्याउड्या मारल्या गेल्या अनेक सबबी सांगितल्या पणं युती झाली नाही….!!
मविआ ने जागा वाटपाच्या बैठकीत वंचित बहूजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष यांना बाहेर बसवून अपमानास्पद वागणूक दिली….!!

मविआ आणि वंचित बहूजन आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात भिक दिल्याप्रमाणे एक, दोन जागा देतोय असा मिडिया मधून प्रचार करुन वंचित बहूजन आघाडीला डिवचण्याचा, किंवा कमी लेखण्याचा प्रकार केल्या जातोय….!!

वंचित बहूजन आघाडीची आम्हाला नितांत गरज आहे हे मविआ मधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तोंडाने बोलून दाखवायचे मात्र प्रत्यक्ष कृती ही सन्मानजनक न ठेवता अपमानास्पद करायची हा काय प्रकार आहे…???
मविआ महाराष्ट्रात स्वबळावर भाजपा ला पराभूत करू शकते का.? त्याचे उत्तर नाही असेच आहे…!!
आपणं भाजपला रोखू शकत नाही, वंचित ला सोबतं घेण्याशिवाय पर्याय नाही तरीही वंचित बहूजन आघाडी सोबतं सन्मानजनक युती का होतं नाही.??मग घोडं अडलं कुठं…???
रिंग मास्टरने सर्व भ्रष्टाचारी नेत्यांच्या दो-या आपल्या हातात आवळून धरल्या आहेत…!!
रिंग मास्टरला वाटतेय मविआ मध्ये वंचित बहूजन आघाडीचा समावेश झाला तर महाराष्ट्रात पानिपत होईल म्हणून मविआ मधील जबाबदार नेत्यांना धाक दाखवून युती होऊ नये म्हणून आदेश दिले असावे….!!
मविआ मधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी रिंग मास्टर च्या दबाला बळी पडू नये तो वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातो आता दबावाखाली न वावरता भाजपा ला पराभूत करण्यासाठी वंचित बहूजन आघाडी सोबतं सन्मानजनक युती करावी अशी तमाम जनणेची इच्छा आहे….!!
मविआ मधील नेत्यांचे बोलणे आणि वागणे परस्पर विसंगत असल्याने ते रिंग मास्टर च्या दबावाखाली वावरतात, जेलमध्ये जाण्याला भितात,त्यामुळे स्वतः ला वाचवितांना त्यांची त्रेधातिरपीट होतं आहे हा समज जनतेच्या मनात पक्का होतं आहे…!!
कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांच्या मालमत्तेवर टाच आली हे उदाहरण पुरेसे बोलके आहे…!!

लेखक:-
प्रा.भास्कर भोजने
(फुले,शाहु,आंबेडकर विद्वत महासभा – महा.राज्य सल्लागार)
संपर्क-9960241375

RELATED ARTICLES

Most Popular