Homeप्रदेशमनुस्मुर्ती दहन

मनुस्मुर्ती दहन

वाचा महिलांनो मनुस्मुर्ती वाचा, स्वतःच प्रतिबिंब मग आरशात जाऊन बघा. खरोखर तुमची किंमत कांय ते कळेल. खरं तर मनुस्मृती दहन हा दिवस स्त्री मुक्ती दिवस म्हणून साजरे करायला पाहिजे.

महिलांच्या स्टेटस वर झिंगल बेल दिसेल पण मनुस्मृती हा दिवस काय आहे, कशासाठी आहे याची जाणीव सुद्धा नाही आहे.मनुस्मृती एकदा तरी प्रत्येक महिलेने वाचायला हवी आहे. तिचं स्थान कुठं होत आणि परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते स्थान मानाचं, स्वतःला अस्तित्व देण्याचं, करिअर घडवण्याचं, अधिकार मिळवून देण्याचं कितीतरी काम जे महिलांसाठी केल ते सुद्धा समजण गरजेचं आहे.

स्त्री ही दलिताची आहे हा विचार तर बाबांनी केला नाही. पण समाज बाबासाहेबाना केवळ जातीत वगळून तिरस्कार करण्यात व्यस्त आहे. बाकी सर्व बोनस, सुट्या, प्रत्येक सुविधा घेतात पण नाव घेतांना सर्वांना त्रास होतोय. महिला जी देश घडवते, समाज घडवते तो नारिशक्ती म्हणून त्यांना अधिकार मिळवून दिले.

जे अधिकार इतर देशात महिलांना मिळवायला, सुख सुविधा मिळवायला कितीतरी वर्ष लागले. तिथं महिला स्वतः लढल्या. भारतात आयती सर्व बाबांनी बेडया मुक्त आयुष्य दिल तरीही महिलेला जाणीव नाही याची खंत आहे.

लेखक – प्रा.प्रिया मेश्राम (असिस्टंट प्रोफेसर), नागपुर

RELATED ARTICLES

Most Popular