दिनांक 29 जुलै 2024 रोजी चाळीसगांव तालुक्यातील धुळे जिल्हा सीमेवर असलेल्या कुंझर , करमुड व दहीवद या गावात राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल यांनी संपर्क दौरा केला.यात 3 गावात बैठका घेण्यात आल्या आणि नागरिकांशी चर्चा करण्यात आली. या सम्पर्क दौऱ्याचे आयोजन तालुका संपर्क प्रमुख आयु.नाना घोडेस्वार यांनी केले होते. तालुका अध्यक्ष आयु.महेंद्र जाधव, सहसचिव आयु.विशाल पगारे हे सहभागी झाले होते.या दौऱ्यात धुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चाळीसगांव तालुक्यातील कुंझर येथे रात्री 8 वाजता बैठक घेण्यात आली. असंख्य नागरिक जमा झाले होते.महिलांची देखील मोठी उपस्थिती होती.येथील तरुणांसह मुलींनी देखील समता सैनिक दलाचे गणवेश तयार करून बाबासाहेबांच्या विचाराचे सैनिक होणार असे विचार व्यक्त केले. राहुल वाघ , दर्शन वाघ , शुभम वाघ, प्रशांत वाघ यांचे सह स्थानिक लोकांनी या बैठकीचे आयोजन केले होते.रात्री 9 वाजता वाजता करमुड येथे दुसरी बैठक घेण्यात आली.यावेळी तरुणांशी चर्चा करण्यात आली. सोमनाथ केदार, अनिल केदार ,दीपक सरदार , विनोद केदार ,सागर बागुल , विजय केदार , ऋतिक केदार यांनी या बैठकीचे नियोजन केले होते.रात्री 10 वाजता दहीवद येथे बैठक घेण्यात आली. याठिकाणी गावातील तीन वॉर्डातील नागरिक उपस्थित होते. या गावात पुन्हा नियोजन करून जाहीर सभा घेण्याचे ठरविण्यात आले.शिवाजी केदार ,राहुल बागुल,सचिन बागुल,रमेश घोडे ,जितेंद्र जाधव, भुषण घोडे,अमोल घोडे ,अनिल बागुल ई.कार्यकर्त्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.या दौऱ्यात ग्रामीण भागात प्रत्येक गावात दलाची कमिटी तयार करण्यात यावी.गणवेशधारी सक्रिय सैनिक तयार व्हावे.दलाची सभासद नोंदणी करण्यात यावी यावर भर देण्यात आला.समता सैनिक दलाची सामाजिक आणि राजकीय जबाबदारी आणि राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलासाठी निश्चित केले कार्य आणि ध्येय याबाबत मुद्देसूद माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या हितासाठी प्रचंड कार्य केले आहे. तसेच सातत्याने सर्व भारतीयांच्या कल्याणाचा विचार प्रयत्न केला आहे. त्या अनुषंगाने समता सैनिक दल हे सर्व जाती-धर्मासाठी खुले असुन , सर्व भारतीयांनी जात – पात आणि धर्मभेद विसरून समता सैनिक दलात सहभागी व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी तळमळीने प्रयत्न करावे असे आवाहन राज्य अध्यक्षांनी केले.
विशाल पगारे,तालुका सहसचिव,SSD चाळीसगांव (सम्पर्क – 9921323281 – 7020558011)