वार.मंगळवार, दिनांक :११/०६/२०२४ चैत्यभूमी. दादर. हसमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, आंबेडकर नगर, पालघर – पूर्व यांच्या सौजन्याने चैत्यभूमी, दादर येथे शूज आणि चप्पल ठेवण्याचे चांगल्या दर्जाचे ०३ स्टँड भेट स्वरूपात देण्यात आले. त्यामधील ०२ स्टँड विक्रम दिपक गावंडे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दान स्वरूपात दिले आहेत. चैत्यभूमी येथे अश्या स्वरूपाची भेट ही पहिल्यांदाच पालघर जिल्ह्यामधून देण्यात आली आहे.
ही भेट नक्कीच सोप्पी नव्हती. ०५ फूट रुंद आणि ०४ फूट उंच आकाराचे जवळजवळ प्रत्येकी ३० किलो वजनाचे असे ०३ शूज स्टँड पालघर ते बोरिवली आणि मग बोरिवली ते दादर असे रेल्वेचा प्रवास करणे नक्कीच तारेवरची कसरत होती. त्यात हे तिन्ही स्टँड घेऊन प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी रेल्वे ब्रीज चढणे – उतरणे, दादर वरून टॅम्पोने चैत्यभूमी पर्यंत घेऊन जाणे हे खरच खूप अवघड होते. परंतु हसमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतील सदस्यांनी निस्वार्थी आणि कर्तव्य भावनेने हे करुन दाखवले.
हसमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेमध्ये निस्वार्थपणे काम करणारे विक्रम दिपक गावंडे, स्वप्निल राजाराम जाधव, पंकज सत्यवान जाधव, सागर किसन गायकवाड, दीपेश सुकूर जाधव, दीपेश चंद्रकांत जाधव, सुमित रामदास गायकवाड, निखिल चंद्रकांत जाधव, मयूर रविंद्र राऊत, कौतुक राजन राऊत असे कर्तबगार सदस्य कार्यरत आहेत. वरील भेट देण्यामागे ह्या सर्वांचा वाटा आहे. पालघर जिल्ह्यामधील समाज बांधवांकडून हसमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्था व विशेष करून आयु. विक्रम दिपक गावंडे यांचे कौतुक करण्यात येत आहे.
भेटवस्तु पालघर ते चैत्यभूमी पर्यंत पोहोचविण्याकरिता विक्रम दिपक गावंडे, स्वप्निल राजाराम जाधव, पंकज सत्यवान जाधव, कौतुक राजन राऊत, मिलिंद किशोर जाधव, अमोल हरिभाऊ गावंडे, कैलास सुखदेव तायडे, योगेश गजानन इंगोले, समीर विजय जाधव हे सदस्य पुढे सरसावले.
सुनील शेलार, पालघर तालुका प्रतिनिधि, प्रकाशपर्व न्यूज चॅनल