मी समाज पाहिला आहे स्वतःला विकताना,
बाबासाहेबांच्या जन्मदिनी रॅली मध्ये रक्ताच पाणी होईपर्यंत नाचताना,
मी समाज पाहिला आहे स्वतःला लाचार होऊन मनुवादया समोर झुकताना,
मी समाज पाहिला आहे आंदोलनात मरेपर्यंत लढताना,
मी समाज पाहिला आहे स्वतःला विकताना,
मी समाज पाहिला आहे बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनी,
समाज पाहिला आहे मी रडताना,आक्रोश करताना,
मी समाज पाहिला आहे स्वतःला विकताना,
सभा मंडपात खुर्चीसाठी झगडताना,
आज बाळासाहेबांना तुमची आमची गरज असताना,
मी समाज पाहिला आहे स्वतःला,मी समाज पाहिला आहे विकताना,
आपली लायकी नसताना बाळासाहेबांच्या विरोधात मनुवादी गरळ ओकताना
मी समाज पाहिला आहे स्वतःला विकताना
मी समाज पाहिला आहे महाड चवदार तळ्याच पाणी चाखताना
मी समाज पाहिला आहे,रमाई नगर घाटकोपर बोळीबार,
खैरलांजी हत्याकांडात आंदोलनात रस्त्यावर लढताना,
मी समाज पाहिला आहे,लाचार होऊन स्वतःला,
मी समाज पाहिला आहे,
आज गरज असताना दुसरीकडे झुकताना…
लेखक:- सुनिल काशिनाथ शेलार