Homeराजनिति"भाजपा पक्षाची विचारधारा कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे अप्रत्यक्ष पक्षामद्धे राबवित आहेत" -...

“भाजपा पक्षाची विचारधारा कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे अप्रत्यक्ष पक्षामद्धे राबवित आहेत” – कॉँग्रेस नेते पुरुषोत्तम दातकर,अकोला

बुधवार. दि: २२/०४/२०२४ रोजी अकोला मतदार संघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचाराची भव्य सभा आयोजित केली होती. त्या सभेला संबोधित करताना अकोला मतदार संघातील कॉँग्रेस नेते पुरुषोत्तम दातकर यांनी बंडखोर उमेदवार अभय पाटील आणि कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांच्यावर गंभीर आरोप करताना पाहायला मिळाले. कॉँग्रेस पक्षामध्ये कश्यापद्धतीने फोडाफोडीचे राजकारण चालू आहे त्या मुख्य विषयावर संभाषण केले.

कॉँग्रेस नेते पुरुषोत्तम दातकर आपल्या भाषणामध्ये म्हणाले की,महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी वंचित सोबत युती करण्यास तयार असताना कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांच्या हस्तक्षेपामुळे युती होऊ शकली नाही.

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी युतीमद्धे येण्यासाठी शेवट पर्यन्त प्रयत्न केले परंतु युती होऊ शकली नाही. नाना पटोळे यांचे विचार भाजपा पक्षाशी एकनिष्ठ असून युती पासून वंचित ला वंचित ठेवण्याचे काम केले आहे. अकोला मतदार संघामध्ये श्रद्धेय बाळासाहेबांच्या विरोधात कॉँग्रेस पक्षाने अभय पाटील यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे बंडखोरी केली आहे. अभय पाटील यांचे वडील हे विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष होते.

सध्या प्रचार व प्रसार सोशल मिडिया चा उपयोग करीत असलेले अभय पाटील यांची प्रत्तेक पोस्ट आर एस एस यांच्या विचारधारीची असून त्यांना काही कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले असता उत्तर देताना म्हणाले की. माझे संस्कार जरी आर एस एस संघामधून घडले असले तरी कॉँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहून पक्ष वाढवण्याचे काम करीत आहे. म्हणजेच यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे अकोला जिल्हयामध्ये स्वराज्य सभागृह येथे पक्षाची सभा भरवली असताना पाहायला मिळाले.

अभय पाटील यांचे सुडबुद्धिचे राजकारण कॉँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी चे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना माहीत पडताच अकोला मतदार संघातून तिकीट नाकारले असून सुद्धा प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांच्या हस्थक्षेपामुळे उमेदवारी मिळवून दिली. अश्या पद्धतीने जनतेसमोर कॉँग्रेस पक्षामद्धे चालू असलेली बंडखोरी पक्षाचे नेते पुरुषोत्तम दातकर यांनी बाळासाहेबांच्या मंचावरून ऊघडकीस आणली.

भाषणाच्या शेवटी कॉँग्रेस नेते पुरुषोत्तम दातकर यांनी उपस्थित जनतेला आव्हान केले की आपल्या सर्वांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना प्रचंड मतांनी विजय करून संसदेत पाठवावे.


अकोला व बुलढाणा जिल्हा समन्वयक, शरद इंगोले, प्रकाशपर्व न्यूज

RELATED ARTICLES

Most Popular