Homeप्रदेशकुणालाही "दाता" होता येत नाही...!!

कुणालाही “दाता” होता येत नाही…!!

भारतीय पुराणात दानी वृत्तीचं पात्र म्हणून कुबेराचं नांव प्रसिद्ध आहे….!! जे मागेल ते त्याच्या पदरात दान देणारा म्हणजे कुबेर…!! प्रत्येक कालखंडात पद, प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता मिळवितांना धडपडणारा व्यक्ति दातृत्व भाव असलेल्या नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पहात असतो. अर्थात तो कुबेर शोधतं असतो….!! कुबेर एकच होऊन गेला. सगळ्याच राजांना कुबेर होता आले नाही…!! कुबेराचा खजिना कधीच रिकामा झाला नाही. देणारा हा मनाने श्रीमंत पाहिजे, त्याच्या कडे देण्यासाठी कधीच उणीव भासतं नाही…!! आम्ही राजे आहोत, या महाराष्ट्राचे मालक आहोत अशा अविर्भावात मविआ आघाडी मधील प्रस्थापित घटक पक्ष कॉंग्रेस,शिवसेना (ऊबाठा) गट,राष्टवादी कॉंग्रेस (शप) गट वागतं होते आणि म्हणून ते म्हणतं होते मविआ मधील सहकारी छोट्या छोट्या राजकीय पक्षांना सन्मानजनक जागा देऊन आम्ही मविआ आघाडी अधिक मजबूत करु, अर्थात आम्ही दाते आहोत,छोट्या राजकीय पक्षांना देण्याची आमची वृत्ती आहे असा भाव ते प्रकट करीत होते.त्यामध्ये शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना एक जागा देऊ असे नेहमी बोलायचे प्रत्यक्षात मात्र राजू शेट्टी यांना त्यांची हक्काची हातकणंगले ची एक जागा सुद्धा दिली नाही….!! संभाजी ब्रिगेडच्या तोंडाला सुद्धा पाने पुसली,काहीच दिले नाही, संभाजी ब्रिगेड अजूनही फक्त तोंडाकडे बघतेय.समाजवादी पार्टी च्या तोंडाला सुद्धा पाने पुसली त्यांनाही काहीच दिले नाही,आणि वंचित बहूजन आघाडीला एक जागा देतो, दोन देतोय, तीन देतोय अशा भिकारचोट घोषणा मिडिया मधून करीत राहिले, प्रत्यक्षात मात्र एकही जागा कुणालाच देण्याची मविआ ची ऐपत नाही…!! आडातच नाही तर पोह-यात येईल कुठून…??? पिढ्यानपिढ्या गरीबांच्या ताटातील ओरबाडून खाणारे,सत्तेवर मांड मारुन बसणारे,संपत्तीसाठी भ्रष्टाचार करुन आपली तुंबडी भरणारे हावरट राजकीय घराणे,इतरांना,किंवा वंचितांना देण्याची दानी वृत्ती कसे बाळगतील..??? मविआ ला २०२४ च्या निवडणुकीत दाता होता आले नाही हे वास्तव कुणी नाकारेल का.??? मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे कुबेर आहेत हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे…!! मविआ मधील बोलघेवडे नेते बोलतं राहिले, दोन देतोय, तीन देतोय, चार देतोय प्रत्यक्षात कृती मात्र शुन्य…!! ज्यांची देण्याची दानतचं नाही ते देणार कोठून आणि कसे..?? परंतु वंचित बहूजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष कृती केली चार जागेवर कोल्हापूर, सांगली, नागपूर, बारामती मध्ये मविआ ला बिनशर्त पाठिंबा देऊन जणूकाही ठणकावून सांगितले की, तुम्ही कोण देणारे,? तुमची काय ऐपत आहे.? ह्या चार जागा मी तुम्हाला देतोय. पाहिजे असल्यास कुबेराच्या दरबारात या आणखी दान द्यायची तयारी आहे…!! कॉंग्रेस पक्षाला सात जागेवर बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे जसे बोलतात तसे वागतात सुद्धा…!! दाता प्रत्येकाला नाही होता येतं, दातृत्व ही मनाची अवस्था आहे आणि ते कुबेर वृत्तीच्या नेतृत्वामध्येच असते…!! जसे मविआ ला चार जागेवर बिनशर्त पाठिंबा देऊन दातृत्व सिद्ध केले अगदी तसेच राजकारणातून एकाकी पडलेल्या मुस्लिम समुहाला तीन ठिकाणी उमेदवारी देऊन अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मी कुबेर वृत्तीचा आहे हेही सिद्ध केले आहे…!! महाराष्ट्रातील तमाम जनतेने लक्षात घ्यावे की, भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,(शप)गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गट, शिवसेना,(ऊबाठा) गट , शिवसेना (एशिं) गट या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवार यादीत एकही मुस्लिम उमेदवार नाही…!! अल्पसंख्याक समुह लिंगायत आणि जैन समुहाला वंचित बहूजन आघाडीने उमेदवारी च्या रुपाने प्रतिनिधित्व दिले आणि सर्वांना सोबतं घेऊन प्रत्येकाला न्याय वाटा मिळाला पाहिजे ही भुमिका घेतली आहे…!! वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे “दाता” म्हणून महाराष्ट्रात पुढे आले आहेत…!! महाराष्ट्रातील राजकारणात प्रत्येकाला सत्तेतील न्याय वाटा देण्याची दानतं आणि दातृत्व अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या ठायी आहे हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध होतं आहे…!! अजून निवडणुकीचे घोडा मैदान पुढे आहे, आगे आगे देखिए होता है क्या…!! वंचितांनो सज्ज व्हा सर्वांना सत्तेतील न्याय वाटा मिळवून देण्याची मोठी जबाबदारी दानी नेतृत्वाने आपल्या खांद्यावर दिली आहे…!! लढेंगे और जितेंगे…!!

लेखक:-प्रा.भाष्कर भोजने,(फुले,शाहु,आंबेडकर विद्वत महासभा-राज्य सल्लागार),मो.नं.99602 41375

RELATED ARTICLES

Most Popular