राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल साहेब मार्गदर्शनानुसार दि.२१ मार्च गुरुवार रोजी उंबरखेड, पिंपळवाड म्हाळसा, टाकळी प्र.दे., शिरसगाव या गावांमध्ये प्रचार समता सैनिक दलाचा प्रचार करण्यात आला.या दौऱ्यात वेगळ्या समाजातील लोकांना भेटून दलाचे महत्व सांगण्यात आले. तसेच संघटनेचे पत्रक देखील वाटप करण्यात आले.तसेच दिनांक २५ मार्च 2024 रोजी ग्रामीण भागात मेळावा घेण्यात आला.या दौऱ्यात नियोजित मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
प्रचाराचे नेतृत्व जिल्हा सचिव नितीन मरसाळे , तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव यांनी केले.बाबा पगारे तालुका प्रसिद्धी प्रमुख,मनोज जाधव तालुका संघटक,विशाल पगारे सहसचिव हे देखील या दौऱ्यात सामील झाले होते.
सचिन बार्हे,जळगाव जिल्हा समन्वयक,मो.नं-7066668723