Homeराजनिति"नारीशक्ती सन्मान,हा पुरस्कार देऊन ग्रामशाखा महिला पदाधिकाऱ्यांना विशाखाताई सावंत यांनी पुरस्कृत केले.धडाकेबाज...

“नारीशक्ती सन्मान,हा पुरस्कार देऊन ग्रामशाखा महिला पदाधिकाऱ्यांना विशाखाताई सावंत यांनी पुरस्कृत केले.धडाकेबाज महिला नेतृत्व – विशाखाताई सावंग (वंचित बहुजन महिला आघाडी, बुलठाणा जिल्हा)”

वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याला विशाखाताई सावंग ह्या वंचित बहुजन महिला आघाडीला पहिल्यांदा सक्षम चेहरा मिळाला आणि त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची महिला नेतृत्व करण्याची संधी,जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली ती त्यांनी प्रामाणिकपणे स्वीकारली आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या, महिलांच्या, वृद्धांच्या विविध समस्या घेऊन विशाखाताई सावंग यांनी बुलढाणा जिल्ह्यात महिला भगिनींची क्रियाशील फळी तयार करून वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांचा सक्षम पर्याय उभा केला.त्यासाठी त्यांनी गावागावात रात्रंदिवस फिरून ग्राम शाखा बनविण्याचा धुमधडाका लावला. एवढेच नव्हे तर कधीही घराच्या बाहेर न पडणाऱ्या महिलांना त्यांनी तालुक्यापासून तर मुंबई ,नागपूर ,पुणे अशा महानगरापर्यंत शेकडो महिलांना विविध आंदोलनामध्ये सहभागी करून आपल्या कार्याची चुणूक दाखवली . तालुक्यात जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सभा आंदोलने मोर्चा असो त्यामध्ये विशाखाताई सावंग यांनी हिरीरीने भाग घेऊन महिलांमध्ये उत्साह, प्रेरणा, जागृती, धाडसी वृत्ती, पक्षाप्रती निष्ठा निर्माण केली. अशी विविध आंदोलने , मोर्चे यशस्वी करून दाखवले आणि महिलांच्या गळ्यातील त्या ताईत बनल्या. महिलांच्या समोर एखादी अडचण उभी राहिली की त्यांना लगेच विशाखाताई सावंग यांची आठवण येते आणि ते लगेच त्यांना फोन करतात. ताईचा फोनही खणखणतो आणि तेवढ्याच जोमाने त्या संकटग्रस्त महिलांना मदत करतांत ,मदतीचा हात पुढे करतात . महिलांना म्हणतात काळजी करू नका. येणारा काळ आपलाच आहे .

आज सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेऊन विशाखाताई सामाजिक परिवर्तन करताना दिसत आहे.सकाळी निघण्याची वेळ ते रात्री घरी येईपर्यंत चा वेळ कदाचित त्यांना माहिती असून सुध्दा समाजासाठी आणि समाजाच्या परिवर्तनासाठी त्या स्वतःला विसरून जातात. खऱ्या अर्थाने वंचित घटकातील समाजाच्या समस्या घेऊन, अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक ,प्रलंबित समस्या प्रशासनाच्या शासन दरबारी मांडण्याचं काम त्या आज करताना दिसत आहेत.महिला भगिनी मध्ये गाव खेड्यात उत्साहाचं,आनंदाचा वातावरण निर्माण झालं आहे. त्यांनी शिरजगाव देशमुख येथील ग्राम शाखा फलक उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्राम शाखा महिला पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेले रवींद्र दादा गुरव प्रभाकर वरखेडे सुमनथाटे तसेच गोंधनापूर येथून तायडे मंगला तायडे किरण तायडे संगीता तायडे करुणा लांडगे चंदा लांडगे कविता लांडगे अनिता नितोने गीता लांडगे वंदना लांडगे सूर्यकांता लांडगे शीला लांडगे येथून सुकेशने मिळे सुनिता मेढे सिंधू सुरडकर सुनीता इंगळे मीरा शिरसाट सुनिता मेढे लता सुरडकर छाया लांडगे पडशी बुद्रुक येथून सुनिता ठोसरे रेखा ठोसरे सुनिता ठोसरे संगीता ठोसरे सिंधू ठोसरे पद्मिनी ठोसरे मीरा ठोसरे शकुंतला ठोसरे रोना येथून जय मला सांगून आशा सावंग प्रमिला सावंग प्रियंका सावंग सविता सावंग वर्षा वानखेडे लाखानवाडा येथून रविता वाकोडे अंबिकापूर येथून वेणूताई सोनवणे लोकांना येथून तालुका अध्यक्ष संगीता गवार गुरु तालुका उपाध्यक्ष इंदुबाई वानखेडे तसेच शिरजगाव येथून संगीता खंडेराव मंदा इंगळे मीनाक्षी हिवराळे मनीषा खंडेराव ज्योती खंडेराव भारती खंडेराव वंदना खंडेराव सुनीता इंगळे आशा खंडेराव विद्या खंडेराव अशा शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या त्यांना जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंत यांच्या हस्ते महिला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शरद इंगोले
अकोला,बुलढाणा जिल्हा समन्वयक
प्रकाशपर्व न्युज
संपर्क-9689211382

RELATED ARTICLES

Most Popular