राष्ट्रीय निसर्गोपचार दिन १८ नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो. आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराची काळजी आता निसर्गोपचाराच्या माध्यमातून घेता येते. जुन्यातला जुना आजार बरा करण्यासाठी नॅचरोपॅथी म्हणजेच निसर्गोपचार पध्दतीचा वापर केला जातो. निसर्गोपचार पद्धतीत आजाराच्या लक्षणापेक्षा सरळ आजाराचा शोध घेतला जाऊन त्यावर उपचार केला जातो. निसर्गोपचार पध्दती मध्ये व्यक्तीला झालेला आजार बरा करण्यावर अधिक भर दिला जात असे. लक्षणापेक्षा आजाराचा शोध घेऊन त्या दिशेने उपचार पद्धतीची निवड करून उपचार केला जात होता. रुग्णाला या उपचार पध्दतीत कुठल्याच प्रकारची शारीरिक इजा पोहचत नाही. निसर्गोपचार ही अशी एक नैसर्गिक उपचार पध्दती आहे की, जी आपल्या मन व आरोग्याची काळजी घेत असते. निसर्सोपचार तज्ज्ञ आपल्या रूग्णाच्या जीवनशैलीवर बारीक लक्ष ठेऊन असतात. निसर्गोपचार पध्दतीत होमिओपॅथी, आर्युवेद, स्पायनल मॅनिप्यूकेशन, न्युट्रिशन, हायड्रोथेरेपी, मसाज व व्यायाम अशा अनेक प्रकारच्या पर्यायी उपचार पध्दतीचा ही उपयोग करतात. ही पध्दती आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला मिळालेले एक वरदान आहे. आपण पाहिजे तेथे ह्या उपचार पध्दतीचा वापर करू शकतो. इतर उपचार पध्दतीत रूग्णावर विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. मात्र निसर्गोपचार पध्दतीत साईड इफेक्ट होण्याची मुळीच भीती नसते. आपण कितीही खर्च केला तरी आपल्या पाहिजे तसे आरोग्य मिळूच शकत नाही. ते आपल्याला स्वत:ला उभे करावे लागत असते. निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपल्याला आरोग्याची बांधणी करावी लागते. इतर औषधीचे अतिसेवन केल्यास त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होत असतो. निसर्गोपचार पध्दती ही विनाऔषध उपचार पध्दती असून आता सगळ्याना या उपचार पध्दतीची महत्त्व पटले आहे. फार प्राचीन उपचार पध्दती असल्याने याबरोबर पातंजली योगसूत्रांचाही वापर केला जात असतो. आजाराने खचलेल्या रूग्णाचा आत्मविश्वास उच्चावण्यासाठीही निसर्गोचार पध्दतीचा उपयोग केला जातो.
लेखक:- सुनिल शेलार
9273523115,9767473919
(पालघर)