विवाहित स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात, भांगामध्ये कुंकू भरतात. कुंकू लावल्याने महिलांच्या सौंदर्यात भर पडते अर्थातच सौंदर्य खुलून दिसते. स्त्रियांच्या सोळा शृंगारांपैकी एक शृंगार कुंकू समजला जातो.
कुंकू लावण्याची प्रथा असली तरी त्यामागे विज्ञान दडलेले आहे कुंकामध्ये पारा असतो. त्यामुळे कपाळावर कुंकू लावल्याने ताण दूर होतो. डोके शांत राहते. संपूर्ण चेहऱ्याच्या संवेदनांसाठी जबाबदार असणारा मज्जातंतू म्हणजे ट्रायजेमिनल नर्व्ह. हा मज्जातंतू याच भागात आहे. म्हणजेच दोन भुवयांच्या मध्यभागी. त्या मज्जातंतूच्या एकूण तीन शाखा आहेत. या जागेवर दाब पडल्याने सायनसचा त्रास कमी होतो. दोन्ही भुवयांच्यामध्ये आज्ञाचक्र असते. या आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. कपाळावर बोटाने कुंकू लावताना हलकासा दबाव पडतो तेव्हा त्वचेला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे स्नायू सक्रिय होतात. यामुळे चेहरा तेजस्वी होतो. हळद, नागरमोथ्यापासून कुंकू तयार केले जात असल्याने त्याचेही गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर ठरतात. तरीही त्याचा संबंध आम्ही आमच्या सोयीने जोडलेला आहे. त्याचे विविध अर्थ काढून प्रत्येक वेळी त्या स्त्रीला वाडीत टाकण्याचा मानसिक प्रताडीत करणारा अनुभव का?
हळदी कुंकू हा समारंभ विधवा आणि डिवोर्सी महिलेकरिता आत्मगौरवाची भावना कमी आणि अपराधीपणाची अधिक असते. तिला वाटत वेळेनुसार जखमा भरून काढावे आणि आयुष्य नव्याने जगायचं प्रयत्न करावं. खरं तर तुम्ही स्वतःला बदलू इच्छिता ना? हिच तुमची या बाबतीतची यशाची हसत जगण्याची पहिली पायरी असते. हळदी कुंकू हा समारंभ विधवा महिलांसाठीही नाशिक, पुणेकडे आयोजित केला जातो. या कार्यक्रमातून विधवा महिलांचा सन्मान केला गेला आणि त्यांच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण केलाय.पण हे बोटावर मोजण्याइतकंच. कोणत्याही प्रकारचा मोठा बदल तणावं निर्माण करतो. जीवनपद्धती, रुढी, परंपरा मानवाणे ठरवलेली असते. अंतरीचा विवेक जाग ठेवून मूळ कारण समजून मानव जातीला जगण्याचा अधिकार असायला हवा.शरीरावर, मनावर अन्याय होतच राहतो. विरहाच्या ताणतणावात मन व शरीर पोखरून निघतो.तसत्या फाटक्या नशिबासकट पांढऱ्या पायाची म्हणत कडू शब्द, अपशब्द बोलून बाहेर खेचून घराबाहेर काढणारे आपलीच लोक असतात. नवरा गेला कि सासर, समाज संपूर्ण अस्तिव मिटून जाते. यामुळे समाज आणखी दुय्यम वाडीत टाकलेल छळ तिला सोसायला भाग पाडतो. तिचं अस्तित्व नाही का? जबाबदारी खांद्यावर आली कि स्वतःसाठी वेळ मिळत नसते. त्यात समाजाच्या रूढी परंपरा विसरू देत नाही कि, “बाई तुझा नवरा राहिलेला नाही. तू बिन नवऱ्याची आहेस म्हणून सणवार, पुजापाठ यासाठी अशुभ मानलं जाते.या समारंभातील हळदी आणि कुंकू यांची देवाणघेवाण केली जाते. पुण्यातील भोरमध्ये याचं परंपरेला छेद देत विधवा, डिवोर्सी समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांच्या विधवा महिलांसाठी हळदी कुंकूच्या सणवारात पुन्हा तो सन्मान मिळाला म्हणून महिला गहीवरल्या, अनेकींना अश्रू अनावर, परंपरेला फाटा देत ‘ कार्यक्रम राबवले गेले.समाजामध्ये प्रबोधनातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करूनही समाज काही अंश बदलण्याचा प्रयत्न फक्त सोशल मीडियावर दाखवण्यापूर्ती असतो पण मनातून स्वीकारता नाही. .
या हळदी कुंकूमुळे विवाहित स्त्रियांच्या वैवाहिक स्थितीचे आणि पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक दर्शवले जातात ज्याचं संबंध केवळ स्त्री सौन्दर्य साठी निगडित आहे. जे प्रत्येक स्त्री नवरा, प्रियकर आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी करतेय. ती नेहमी नवऱ्याचा विचार करते. आकर्षक दिसणे हा गुण प्रत्येकात असतो, प्रेम असतो. पण नवरा व्यक्तीच आयुष्यात नाही म्हणून आपलं मन अन्न, पाणी, नटणं मुरडन सर्व गोष्टीपासून कोसो लांब होतो. अचानक आलेली दुहेरी जबाबदारी पार पाडताना स्वतःला आरशात बघून नटायला वेळ नसतोच. पण त्या स्त्रीच दुःख हळूहळू कमी करत नवऱ्याच्या आठवणी जिवंत ठेवायला, त्याच्या नावाचं साज करायला आवडते असेल तर चांगल आहे. यापलीकडे तिने स्वतःसाठी जगते म्हणून ठरवलं तर वाईट काय. तिचं स्व: अस्तिव जास्त महत्वाच आहे.स्त्री स्वतःच एक शक्तिपीठ एक स्री सर्व प्रथम आपल्या कुटुंबाची शिल्पकार असते. ती एक मुलगी, एक पत्नी त्यानंतर एक माता या महत्वाच्या तीन भूमिका बजावते. पण स्त्री हिच स्वतःची भूमिका ती पार पाडत नाही. स्वतःला वगळून, विसरून ती जगतेय.त्यानंतर नात्यांच्या भूमिका आयुष्याबरोबर बदलत जातात. संस्कारातून समाज घडवणारी स्री ही आपल्या जोडीदाराला गमावल्यानंतर मात्र, एकटी पडते. स्री स्वतःच एक शक्ती पीठ आहे. एखाद्या स्रीवर जर दुर्दैवाने वैधव्य आले तर त्यामध्ये तिचा कोणता दोष? स्रीला वैधव्य आले तर तिच्याशी दुजाभावाने वागणूक दिली जाते. तिला शुभ कार्यात दुय्यम दर्जा दिला जातो.जुन्या रुढींचा आधार देऊन दिला तिच्या कर्तृत्वाला झाकोळले जाते. खूप लहान वयात वैधव्य आले. त्यानंतर इतक्या वर्षानंतर असा मान सन्मान प्रथमच कुणी तरी देत आहे. या भावनेने अश्रूला वाट मोकळी करून देताना सर्वाना त्या क्षणी बघायला मिळाले.”अनेक महिला डाॅक्टर, प्राध्यापक तसेच उच्च शिक्षित असून केवळ विधवा असल्यामुळे त्यांचे कार्यकर्तृत्व झाकोळले गेले. तिच्या सामाजिक सन्मानासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. तिला मानसिक बळ मिळावे आणि तिचे कर्तृत्व समाजासमोर यावे, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आले आणि पुढेही अशी कार्यक्रम घ्यायला हवे.”
कॉलेज, शेजारी सगळीकडे हे कार्यक्रम घेताना आलेला अनुभव खुप कटू असतात. पण डोळ्यादेखत काही अनुभव सावित्री मातेला आठवत डोळे भरून येतात. डिवोर्सी स्त्री ला जेव्हा एक सुशिक्षित इंजिअर हळदी कुंकू करताना प्रश्न करते. खरंच या बाईला कुंकू लावायला जमते का? तेव्हा ती शब्द तिच्या मोडक्या संसाराची आठवण करून देत ती अश्या सणवारात सहभागी होऊ शकत नाही. तिचं अस्तित्व नाही याची जाणीव करून देणारी स्त्री च होती. या स्त्रियांना घडवणारी माऊली सावित्री माई ने हाच विचार केला असता तर, हा प्रसंग कोणावरही कधीही ओढवू शकते म्हणून तिचं जगणं कठीण करणारे कसले रूढी परंपरा? आणि पतीच्या निधनानंतर महिलेला कुंकू लावण्यास बंदी घालणं कितपत योग्य आहे. दुखा:चा डोंगर डोक्यावर कोसळलेल्या असतानाही शेती, उद्योगधंदे, नोकरीं,घरं चालवणे, मुलांचं शिक्षण या सर्व जबाबदाऱ्या महिला आपलं कर्तव्य समजून पार पाडतात. तरीही अशा महिलांना समाजात सापत्न वागणूक का? पतीच्या निधनानंतर अनेक हाल अपेष्टा सहन करत कुटुंबाचा गाढा हाकलून मोडून पडलेला संसार उभा केला. पुरुषांची समजली जाणारी सर्व कामे जबाबदारीने पार पाडली. घरात करता पुरुष नाही म्हणून केवळ रडत बसण्याऐवजी ट्रॅक्टरच्या स्टिअरिंग पासून ते मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. पण जेंव्हा मुलाच्या लग्नात त्यांच्या अंगावर अक्षदा टाकण्याची वेळ आली. त्याच वेळेस विधवा असल्याने त्यांना अक्षदा टाकण्यास नकार देण्यात आला. त्यांना या प्रसंगाचे खूप वाईट पतीच्या निधनानंतर सविता कुंभार यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करत कुटुंबाचा गाढा हाकला. मोडून पडलेला संसार उभा केला. पुरुषांची समजली जाणारी सर्व कामे जबाबदारीने पार पाडली. घरात करता पुरुष नाही म्हणून केवळ रडत बसण्याऐवजी ट्रॅक्टरच्या स्टिअरिंग पासून ते मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. पण जेंव्हा मुलाच्या लग्नात त्यांच्या अंगावर अक्षदा टाकण्याची वेळ आली. त्याच वेळेस विधवा असल्याने त्यांना अक्षदा टाकण्यास नकार देण्यात आला. त्यांना या प्रसंगाचे खूप वाईट वाटते. कुंकू धर्मानुसार सुद्धा रूढी बदलतो. जे कट्टरवाद आहे त्यांना या समारंभात कुंकू लावायचं नाही म्हणून अगदी वगळेलेले असतात तर अविविवाहीत मुली सुद्धा या कुंकू पासून लांब असतात. देव्हाऱ्यातल कुंकू आवडीने लावतात. पण हळदी कुंकू मध्ये वाडीत टाकाव तस बसतात. याच संबंध थेट सुवासीन बायका, नवऱ्याच बोधचिन्ह म्हणून ज्यांनी कोणी ठरवलं त्यांनी स्वतःसाठी मी विवाहित आहे असं पुरुषांच्या कपाळावर, भांगेत भरायचं काही बोधचिन्ह ठरवायला हवं होत. माणसाने स्वतःच्या मनाने सर्व रूढी ठरवल्या त्या कचाट्यात मानवतावाद, माणुसकी, मनुष्य म्हणून जगवणं हे अगदी भावनिकरित्या क्रूर करून टाकले. पती मरण पावले. तो माझ्यासाठी धक्का होता, त्यानंतर त्या एकाकी उदास आयुष्य जगतात. त्यांना कधी आरसा पाहायला सुद्धा वेळ नसतो. कंगवा घेऊन केस विंचरले नसले तरी तसच केसांचा जुडा करून कामाला लागतात. अंगावरचा सर्व हिरवा साज काढल्या जाते. यात काही प्रमाणात बदल झालाय की त्या नीटनीटक्या राहायला लागले. पण त्यात सुद्धा खायला उठणाऱ्या नजरा असतातच.
महाराष्ट्र हे समाज सुधारकांचे राज्य आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारश्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी राज्य अशी मान्यता मिळालेली आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुले नाना शंकरशेठ, गोपाळ गणेश आगरकर यांसारख्या समाजसुधारकांनी विधवांच्या प्रश्नावर एकोणिसाव्या शतकापासून काम केले. विधवांच्या केशवपणाच्या बंदीसाठी महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला होता. हा सामाजिक वारसा असताना या कु प्रथेची पाळेमुळे अजूनही शिल्लक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. शासनस्तरावर या प्रथेच्या निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. पती नसलेल्या स्त्रिया उद्योग, शेती सारख्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देत आहेत. त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. समाजातील इतर स्त्रियांप्रमाणे त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजामध्ये या प्रथांच्या ओझ्याखाली दबलेल्या असंख्य स्त्रिया आहेत. ज्याची आयुष्यात सर्व काही संपलं आहे. अशी भावना निर्माण झाली आहे. या स्त्रियांच्या आयुष्यात नवी पहाट येण्यासाठी शासन तसेच सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा.
प्रा.प्रिया मेश्राम लेखिका, प्रकाशक, नागपूर 7588296084