Homeबड़ी खबरेसुरक्षारक्षकांच्या मागणीबाबत कामगार मंत्र्यांचे सकारात्मक चर्चेचे आश्वासन...

सुरक्षारक्षकांच्या मागणीबाबत कामगार मंत्र्यांचे सकारात्मक चर्चेचे आश्वासन…

मुंबई आज दिनांक 21/7/ 2024 रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटनेच्या महाअध्यक्ष सौ अश्विनीताई सोनवणे सरचिटणीस प्रथमेश आल्हाटमहाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटने कडून 27/06/2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण बसले असताना महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे साहेब यांनी शिष्टमंडळास बोलून सौ . अश्विनीताई सोनवणे यांनी उपोषण मागे घेण्यात यावे . असे पाचारण करण्यात आले होते. कामगार मंत्री साहेब यांनी निवेदन देऊन आम्ही तुमचे चालु आदिवेशन संपल्यानंतर सर्व संघटनांना बोलावून तुमची बैठक लावण्यात येईल . असे आश्वासन देण्यात आले . त्या अनुषंगानुसार महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक विविध क्षेत्राचे कार्यरत आहे. परंतु त्यांच्या मागणीबाबत ठोस भूमिका अद्याप शासन दरबारी घेतली नाही म्हणून उपोषणाच्या माध्यमातून शासनात पर्यंत आपल्या मागण्या गांभीर्याने विचार व्हावा . या दृष्टिकोनातून नुकतेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या अध्यक्ष अश्विनीताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कामगार मंत्री महोदय डॉ सुरेश खाडे यांच्या दालनामध्ये सुरक्षारक्षकांच्या युनिफॉर्म बाबत सकर्मक चर्चा साठी बैठक बोलावली असून दिनांक 23 /7/2024 रोजी आयोजन करण्यात आली असून त्यामध्ये सर्व सुरक्षारक्षक संघटनेच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले असे आश्वासन दिले हा सुरक्षारक्षकांचा ऐतिहासिक विजय आहे सुरक्षारक्षक एकजुटीचा विजय असो अशी घोषणाबाजी देत उपोषण स्थगित केले होते.

मा.श्याम जाधव, नाशिक जिल्हा समन्वयक,प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular