दिनांक 2 एप्रिल 2024 ला साकोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालय व सभेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजीतदादा बनसोडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्याचे लोकसभा क्षेत्राचे उमेदवार संजय केवट,भंडारा गोंदिया जिल्ह्याचे निरीक्षक भगवान भोंडे, भंडारा महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवें,भंडारा जिल्हा संघटक डी.जी रंगारी, गोंदिया जिल्हा युवा अध्यक्ष अश्विन डोंगरे साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारीव इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.महाराष्ट्राचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे भगवान भोंडे,भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे उमेदवार संजय केवट यांनी वंचित बहुजन आघाडी व त्यांना का निवडून दिला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले व ऊस शेतकरी या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आव्हान करण्यात आले.याप्रसंगी जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.
मा.राकेश रंगारी,भंडारा जिल्हा समन्वयक(प्रकाशपर्व न्युज)