
धानोरा (भो) ता. वसमत जि.हिंगोली येथे मोठ्या थाटामाटात वंचित ढोल ताश्याच्या गजरात फटाक्याच्या आतिश बाजीत वंचित बहुजन आघाडी ग्राम शाखा उद्घाटन सोहळा पार पडला. पूज्य भदंत पय्याबोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शना खाली सदरील शाखेचा सोहळा पार पडला, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ कांबळे यांच्या हस्ते धानोरा भोगावं येथील शाखा चे उद्घाटन करण्यात आले. पूज्य भदंत पय्याबोधी महाथेरो यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आता देशात दोनच वाद आहेत ते म्हणजे आंबेडकरवाद व मनुवाद तर जनतेने विचार करावा आपण आंबेडकर वाद्यासोबद राहून आपले हक्क अधिकार शाबूत ठेवून समानतेने जगायचं की आपले हक्क आणि अधिकार हिरावून घेणाऱ्या व विषमतावादी विचाराच्या मनुवादी विचाराच्या सोबत राहायचं.आणि पुन्हा गुलामीचे जीवन जगायचे हे ठरविनायची वेळ आली आहे. मा.अनिल भाऊ कांबळे यांनी सांगितले की,2024 मध्ये मोदी व शाह ला सरकार बनविण्याची संधी दिली तर आपण आपली गुलामी बहुजनांची गुलामी ओडवून आणणार आहोत.
जर गुलामी आणायची नसेल तर त्यासाठी कंबर कसून श्रद्धेने ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला हव. आघाडी संदर्भात बाळासाहेब आंबेडकर चे निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेला मान्य असेल. येणाऱ्या 2024 चा हिंगोली लोकसभेचा खासदार वंचितांचे असेल. शेतकरी विद्यार्थी कामगार कष्टकरी यांना न्याय मिळायला पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे. मा.भाई भुजबळ जिल्हा संघटक यांनी मराठा आरक्षण व वसमत विधानसभेतील मोठ-मोठे सहकार महर्षी राजकारणी कारखानदार यांच्यावर सडकून टीका केली. व त्याचबरोबर हे कोणत्याही वेळी भाजप मध्ये प्रवेश करतील याचा नेम नाही.
यावेळी उपस्थित भिक्खू संघ खुरगाव नांदुसा,जिल्हा संघटक भाई भुजबळ,आनंद ढेंबरे, जिल्हा सहसचिव राहुल करवंदे,जिल्हा सदस्य नरेशजी कोकरे,वसमत तालुका महासचिव भास्करभाऊ गवळी,ज्येष्ठ नेते उत्तम मामा करवंदे, युवा नेते राजरत्न गायकवाड,महिला तालुका अध्यक्ष मा.नंदाताई इंगळे,महासचिव मा.लाटे ताई,राम सरोदे,राहुल करवंदे, कांबळे,खिल्लारे आदी जिल्हा भरातील तसेच वसमत तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.शाखा सोहळा अत्यंत उत्साहात ढोल ताश्याच्या गजरात पार पडला.सर्व जाती धर्मातील लोकांचा समावेश करून सदरील शाखा गावकऱ्यांच्या वतीने तयार करण्यात आली.
मा.आनंद ठेंबरे
हिंगोली जिल्हा समन्वयक
प्रकाशपर्व न्युज
संपर्क-9552357358