Homeराजनितिवंचित बहुजन आघाडी कडून तिसऱ्या टप्प्याच्या उमेदवार लोकसभा उमेदवार यादी घोषित

वंचित बहुजन आघाडी कडून तिसऱ्या टप्प्याच्या उमेदवार लोकसभा उमेदवार यादी घोषित

दि.२ एप्रिल वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या(शरदचंद्र पवार) उमेदवाराला बारामती मधून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तथा रेखाताई ठाकूर व राज्य कार्यकारणी समिती यांच्याद्वारे लोकसभा निवडणुकीच्या वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत ज्यांची नावे समोर प्रमाणे घोषित करण्यात आलेली आहेत.नांदेड लोकसभेकरिता अविनाश भोसीकर जात लिंगायत, परभणी लोकसभेकरिता बाबासाहेब उगले जात मराठा, पुणे लोकसभेकरिता वसंत मोरे जात मराठा, शिरूर लोकसभेकरिता मंगलदास बगल जात मराठा अशाप्रकारे तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा उमेदवारांची नावे वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून घोषित करण्यात आलेले आहेत.

अनिल भगत, मुंबई प्रदेश समन्वयक

RELATED ARTICLES

Most Popular