आज दि.12 एप्रिल ला गोंदिया येथे वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या वतीने लोकसभा निवडणूक उमेदवार संजय केवट यांच्या निवडणूक प्रचाराला मा.प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती .त्यासोबतच राज्याचे उपाध्यक्ष मा.सर्वजीत बनसोडे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष विश्वकर्माजी,लोकसभा प्रभारी भगवानजी भोंडे,जिल्हाध्यक्ष सतिष बन्सोड,जिल्हा सचिव राजू राहुलकर,शहराध्यक्ष विनोद मेश्राम,महिला जिल्हा उपाध्यक्ष किरणताई फुले या उपस्थित होत्या.सभेला प्रचारसभेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजयजीकेवट यांना बहुमताने विजयी करा.यासाठी की संविधान हा धोक्यात आहे जर मोदी पुन्हा सत्तेत आला तर सत्येमध्ये विपक्ष हा नसणार आहे आणि त्यामुळे हुकुमशाही प्रवृत्तीची बाजू ही सत्ताधारी पक्ष मांडू शकते अशी भीती आहे.त्यासोबतच त्यांनी सांगितले की देशाच्या राजकारणामध्ये इलेक्ट्रोल बाॅन्डद्वारे हजारो कोटीं रुपयाचा घोटाळा झालेला आहे.तरीसुद्धा मोदी शांत बसलेला आहे आणि काँग्रेस सारख्या पक्षाला ईडीची भीती दाखवून त्यांचे पक्षांतर करत आहे.
तालुका प्रतिनिधी,विनोद रामटेके,प्रकाशपर्व न्यूज