अमरावती मधील दर्यापूर तालुक्यात लोतवाडा येथे स्थानिक वंचितचे जेष्ठ कार्यकर्ता व प्रकाशपर्व न्युजचे अमरावती विभाग प्रमुख भिमराव कु-हाडे यांनी अवैधरित्या वाळुउपसा करणा-या काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्यावर जीवघेणी हल्ला करण्यात आला त्यात ते जबर जखमी झाले.लागलीच निवडक कार्यकर्त्यांसोबत तात्काळ कु-हाडे यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना उपचारासाठी दाखल केलेल्या इर्विन इस्पितळाला भेट दिली आणि संबंधित वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांना उपचारासाठी विशेष लक्ष घालण्याचे आदेश दिले.तसेच परस्पर स्थानिक पोलीस ठाण्यात भेट देऊन भिमराव कु-हाडे आणि त्यांच्या परिवाराला तात्काळ सुरक्षा पुरवण्यात येईल अशी पोलिस निरीक्षक यांच्या कडून हमी घेतली.
अमरावती जिल्हा समन्वयक,हिम्मत गवई, प्रकाशपर्व न्युज
मो.नं.9604959940