यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यामागे मोठे षडयंत्र आहे.अभिजित राठोड यांच्या अर्जात असलेल्या त्रुटी करीता छाननी आधी दिलेल्या नोटीस प्रमाणे अभिजित राठोड यांनी नव्याने प्रतिज्ञा लेख तयार करून सादर करून त्यांना दिलेले त्रुटी पूर्ण केल्या नंतर नव्याने त्रुटी काढून निवडणूक निर्णय अधिकारी पंकज आशिया ह्यांनी वंचित उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे.विशेष म्हणजे त्रुटी पूर्ण झाल्या वर देखील ऐन वेळी छाननी मध्ये नव्याने त्रुटी काढून जाणीवपूर्वक अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.सदर प्रकरणी निवडणुक आयोगास तक्रार करून कार्यवाही करावी अशी मागणीही वंचित कडून करण्यात आली आहे.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड यांनी ०४/०४/२०२४ रोजी दुपारी ३ वाजता त्यांचें नामनिर्देशन पत्र क्र. 30/LS/2024/RO-YTL-Washim दाखल केले होते. उपरोक्त नामनिर्देशन पत्रासोबत सलग्न नमुना २६ मधील शपथपत्रामध्ये स्तंभ क्र. ४ (३), (४) (५) (६), ७ (A) (i) (ii) (iii) (iv) (v) (vi) (vii) (viii) (ix), ७ (B) मधील (i) (ii) (iii) (iv) (v) (vi), ८ मधील (i) (ii) (iii) (iv) (v) (vi) (vii) (viii) (ix), ११ (४), ११(७), ११(८) रिकामे ठेवल्यामुळे नामनिर्देशनपत्राची छाननी होण्यापूर्वी रीतसर भरलेल्या रकान्यासह नवीन शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे व तसे न केल्यास नामनिर्देशनपत्र नाकारले जाईल, असे तपासणीसुची द्वारे श्री. अभिजीत लक्ष्मणराव राठोड यांना कळविण्यात आलेले होते व त्यांची पोच घेण्यात आलेली होती.त्यानुसार अभिजीत राठोड यांनी दि. ०५/०४/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता नविन शपथपत्र निवडणुक निर्णय अधिकारी ह्यांना सादर केले.तथापि नविन शपथपत्रामध्ये स्तंभ क्र. ५(i), ५(ii), ६(i) रिकामे असल्याची त्रुटी छाननीचे दिवशी काढण्यात आली.११ वाजता छाननी होत असताना केवळ १५ मिनिटात नवीन प्रतिज्ञा लेख सादर करण्याचा नवीन तुघलकी आदेश निवडणुक निर्णय अधिकारी ह्यांनी दिला.किमान अर्धा तास तरी द्यावा, अशी विनंती अभिजित राठोड यांनी केली असता ती फेटाळण्यात आली.अगदी ठरवून उमेदवार बाद करण्याचा चंग अधिकारी बाळगून होते.असा एकंदर चकित करणारा प्रकार लोकसभा निवणुकीसंदर्भात घडला आहे.अभिजित ह्यांना दिलेले आधीचे प्रतिज्ञा लेख मध्ये स्तंभ क्र. ५(i), ५(ii), ६(i) रिकामे असल्याची त्रुटी काढली गेली नाही.ती छाननी दरम्यान काढून वंचित बहुजन आघाडी निवडणुकी मधून बाद करण्याचे षडयंत्र रचले गेले.हा प्रकार अत्यंत गंभीर असून निवडणुक निर्णय अधिकारी ह्यांनी आपल्या पदाचा व निवडणुक निष्पक्ष होवू नये असे कुंभाड रचले आहे. त्या बाबत केंद्रीय निवडणुक आयोगा कडे तक्रार करण्यात येत असून पंकज आशिया ह्यांना आलेले कॉल आणि अर्ज सादर करणे व छाननी दरम्यान ते कुणाचे संपर्कात होते, ह्यांचा कॉल डेटा काढून गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
मा.भिमराव कुर्हाडे,(अमरावती विभाग समन्वयक),प्रकाशपर्व न्युज