Homeप्रदेशमहाराष्ट्राच्या मनातील खदखद....!!

महाराष्ट्राच्या मनातील खदखद….!!

ऊपेक्षितांचे राजकीय हक्क डावलणा-या सरंजामी राजकीय पक्षांनो.आमचे प्रश्न सुटतं नाहीत,आमच्या समस्या तुंबून पडल्या, कुणीही आमचा वाली नाही अशी भावना,दलित ,आदिवाशी,भटके विमुक्त, सगळ्या वंचित समुहाची अनुभवाने निर्माण झाली म्हणून राजकीय पक्ष स्थापन करुन,सत्तेच्या दालनात जाण्याची तयारी केली तर आम्हाला तुम्ही बदनाम करणारं.?आम्ही पाच वर्षे पक्ष बांधणी करावी, संघटन मजबूत करावे आणि निवडणूका आल्या की, तुम्हाला मते द्यावीत, निवडणुकीत उमेदवार उभे करु नये असे तुम्हाला का वाटतेय…!! ठोस कारण नमुद करा, नुसते बी. टीम चे आरोप करु नका.?? लाखो करोडो गरीब मराठा बांधवांनी रस्त्यावर येऊन आरक्षणाची लढाई लढावी, मनोज जरांगे सारख्या गरीब मराठा तरुणाचा जीव टांगणीला लागावा आणि तरीही तुम्ही सत्तेत असतांना काहीच करु नये, सभागृहात बोलू नये गरीब मराठ्यांची बाजू मांडू नये, मात्र निवडणुका आल्या की,गरीब मराठ्यांनी तुम्हाला मते द्यावीत हा हक्क कशापाई…??? ठोस आणि समर्पक कारण नमूद करा, जातीच्या नावावर आमची भावनिक कुतरओढ करु नका…!! ओबीसी जनगणना होतं नाही, झाली असेल तर आकडेवारी दिली जातं नाही, राजकीय आरक्षण संपविले आहे, आणि आरक्षणाच्या नावांखाली मराठा × ओबीसी वाद पेटवून आम्हाला कोंबड्या सारखे झुंजविता, निवडणुका आल्या की, तुम्ही आपसात सत्ता वाटून घेता, औषधालाही ओबीसी संसदेत पाठवतं नाही, आमचं ग-हाण सभागृहात कोण मांडेल..??? तुम्ही कायम सत्तेत ठाण मांडून बसले आहात गेली ७३ वर्षे झाली आहेत, काय केले ओबीसी साठी.??? ७३ वर्षांचा अनुभव खूप मोठा आहे, आमच्या तोंडाला पाने पुसणे थांबवा, आता सहन होतं नाही…!! कडव्या हिंदुत्ववादी विचारधारेची भिती दाखवून मुस्लिम समाजाला कायम ७३ वर्षे झाली आहेत भयग्रस्त करुन धाकात ठेवले आहे, मुस्लिम खतरे में है. म्हणतं आमची मते घेतली…!! आणखी किती काळ मुस्लिम खतरे में ठेवता, तुम्हाला मते दिली तरीही तुम्ही बाबरी वाचवू शकले नाही मग आम्हाला कसे आणि कधी वाचविणारं आहात…?? महाराष्ट्रात मुस्लिम समुहावर अन्याय होतो तेव्हा तुम्ही पुढे का येतं नाही, दंगली मध्ये मुस्लिम समुहाला मदत का करीत नाही, आमची संख्या असुनही एकही मुस्लिम खासदार निवडून का येतं नाही…??? आम्ही केवळ वोटबॅंक आहोत हे आता पचनी पडतं नाही. आम्हाला सत्तेचा वाटा हवा आहे…!! मिडिया हा घराणेशाही वाल्यांचा बटीक आहे…!! पाकिटातील चमकं पाहून मिडिया बोलतोय…!! पत्रकार गुळगुळीत भाषा बोलतात त्यावर जनतेने विश्वास ठेऊ नये….!! मिडिया ला हाताशी धरून धनदांडगे सत्ता मिळवितात, घराणेशाही वाले सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मिडियाचा वापर करीत असतात, म्हणून मिडिया तील बातमीवर विसंबून राहू नये ती लोणकढी थाप असु शकते….!! महाराष्ट्रातील खूप मोठा वर्ग ज्याचं मनोगत कधीच मिडिया मांडतं नाही त्याचं मनोगत वर नमूद केले आहे….!! आंबेडकरवादी, संविधानवादी, ओबीसी, गरीब मराठा, मुस्लिम मतदार संख्येने बहुसंख्य आहे आणि तो घराणेशाही ला कंटाळलेला आहे, त्या सर्वांनी एकत्र येऊन घराणेशाही संपविली पाहिजे असे महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनोमन वाटतेय….!! तुम्हाला काय वाटते..???

लेखक:-प्रा.भाष्कर भोजने(फुले,शाहु,आंबेडकर विद्वत महासभा-महा.राज्य सल्लागार)

RELATED ARTICLES

Most Popular