HomeE-Paperबुद्ध मूर्ती अवशेष संदर्भात भारतीय पुरातत्व खात्याकडून अहवाल मागणीसाठी पालघर जिल्हा लेणी...

बुद्ध मूर्ती अवशेष संदर्भात भारतीय पुरातत्व खात्याकडून अहवाल मागणीसाठी पालघर जिल्हा लेणी संवर्धन समिती च्या वतीने जिल्हाधिकारी साहेब पालघर यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

मंगळवार, दि. १८/०६/२०२४ पालघर. सफाळे हद्दीतील पश्चिमेस ४ किमी अंतरावर असलेले मौजे शिलटे गावात तलावाचे खोदकाम करताना बुद्ध मूर्ती आढळल्या होत्या. त्या संदर्भात भारतीय पुरातत्व खात्याकडे सदर प्रकरण देण्यात आले आहे. आपल्या पालघर जिल्हा लेणी संवर्धन समिती च्या वतीने जिल्हाधिकारी साहेब पालघर येथे निवेदन देण्यात आले आहे.


खोदकाम करताना बौद्धकालीन बुद्धांची मूर्ती, बौद्ध चक्र, खांब व इतर शिल्प आढळून आले होते. याबाबत पालघर जिल्हा लेणी संवर्धन समिती असे म्हणणे आहे की, सदर तलावात मांडीवर पाण्यात टाकलेल्या भगवान बुद्धांच्या मुर्त्या पाण्याबाहेर न काढता किंवा परीक्षणासाठी न घेऊन जाता काठावर असलेले काही अवशेष, शिल्प व नमुने परीक्षणासाठी घेऊन गेले आहेत. परंतु काही अवशेष आणि शिल्प यावरून परीक्षण न करता, प्रत्यक्ष जागेचे खोदकाम करून त्यातून मिळणारे शिल्प व अवशेषांचे तसेच पाण्यात टाकलेल्या बुद्ध मुर्त्या यांचे परीक्षण अहवाल जिल्हाधिकारी पालघर यांना सादर करावा. तसेच सदर जागेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता पुरातत्त्व विभागाने संबंधित जागेला आपल्या ताब्यात घेऊन सदर जागेला त्वरित संरक्षण पुरवावे.


पावसाळ्यामध्ये तलाव पाण्याने भरले जाते. असह्यावेळी तलावामद्धे बुद्धांचे अवशेष व मुर्त्या गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मुर्त्या आणि अवशेष पाण्याबाहेर काढण्यात येऊन, पुरातत्त्व विभागाने आपल्या ताब्यात घ्याव्यात व जनतेच्या भावना लक्षात घेता त्वरित कार्यवाही सुरु करावी असे निवेदन पत्र पालघर जिल्हा लेणी संवर्धन समिती च्या वतीने पालघर जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले.


त्या वेळेस पालघर जिल्हा लेणी संवर्धन समिती चे पदाधिकारी आयु. अविश राऊत, आयु. किरण ह जाधव, आयु. नागसेन ख गायकवाड, आयु. आप्पा लोखंडे, आयु. अरुण ह जाधव, आयु. महेश शेलार, आयु. निलेश गावंडे, आयु. सुनिल शेलार, आयु. संजय रा जाधव, आयु. संतोष कांबळे, आयुनि. विद्याताई मोरे, आयुनि. मोहिनीताई जाधव, आयु. विनायक जाधव, आयु. उमेश कापसे उपस्थित होते.


सुनिल शेलार , पालघर तालुका प्रतिनिधि, प्रकाशपर्व न्यूज

RELATED ARTICLES

Most Popular