Homeबड़ी खबरेपालघर तालुक्यामधील सफाळे भागातील ४ किमी अंतरावर असलेले शिलटे या गावी तलावाचे...

पालघर तालुक्यामधील सफाळे भागातील ४ किमी अंतरावर असलेले शिलटे या गावी तलावाचे खोदकाम करताना सापडली बुद्ध मूर्ती.

शनिवार, दि.२५ मे २०२४ रोजी दु १.00 वा.पालघर तालुक्यामधील सफाळे भागातील ४ किमी अंतरावर असलेले शिलटे या गावी तलावाचे खोदकाम करताना बुद्ध मूर्ती आढळून आली आहे. ही बातमी प्रथमता आपल्या प्रकाशपर्व न्यूज चे कार्यकारी संपादक निलेश गावंडे साहेब व पालघर तालुका समन्वय सुनील शेलार सर यांना समजताच बातमीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेऊन तेथील नागरिकांकडून बातमी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेथील स्थानिक नागरिकांकडून असे समजले की गेल्या वर्षी येथे तळावाचे खोदकाम केले असता तेव्हा सुद्धा दगडाचे काही अवशेष सापडले होते. परंतु त्याबद्दल काही माहीत नसल्याकारणाने ते कोरलेले दगडाचे अवशेष एका बाजूला ठेवण्यात आहेत.


आता पुन्हा ह्या वर्षी तलावाचे खोदकाम करताना चक्क बुद्धाची मूर्ती सापडली आहे. बुद्धाच्या मूर्तीचे वर्णन केले असता जंबुदिपचा सुपुत्र शाक्यमुनी तथागत बुदधाची मूर्ती आहे अशी खात्री पातळी आहे. भारत भूमीमध्ये जेथे पण खोदकाम करणार तेथे बुद्धच सापडणार. भारत देश हा बुद्धाचा देश आहे. मनुवाद्यांनी पुस्तकातला इतिहास जरी संपवला परंतु ह्या मातीत लपलेला बुद्धाचा इतिहास संपवता येणार नाही. जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे.


सफाळे भागातील बौद्ध धम्माचे प्रचारक आयु. श्रीपाद शेलार गुरुजी, काळे गुरुजी, दत्ताराम गायकवाड गुरुजी व प्रदीप जाधव गुरुजी यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचक्रोशीतील सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या बौद्ध समाज यांच्या कडून भारतीय पुरातत्व खात्याला उत्खननाची मागणी करून बुद्ध इतिहास किव्हा अजून काही बुद्ध मूर्ती सापडतात का ते पहावे लागेल.

मा. सुनील शेलार, पालघर तालुका समन्वय ( प्रकाशपर्व न्युज )

RELATED ARTICLES

Most Popular