HomeE-Paperनाशिक पंचवटी परिसरात तणावाचे वातावरण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न.

नाशिक पंचवटी परिसरात तणावाचे वातावरण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न.

नाशिक. आज दिनांक २२/०६/२०२४ रोजी पंचवटी राजवाडा परिसरात खळबळ उडून देण्याची घटना घडली असून या घटनेविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नांदवली गेली असून आंबेडकर जनता यांना आव्हान करण्यात येते. की आज अकरा वाजेला काळाराम मंदिर परिसरात निळे झेंडे घेऊन अमोल त्याला विरोध करण्यासाठी नाशिक राजवाडा परिसरात अशा प्रकारचे पत्र रात्रीच्या सुमारास सर्वांच्या दारासमोर टाकून हिंदू युवक वाहिनीने मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे रहा अशी धमकी व आव्हान केले आहे.

या संदर्भात राजवाडा परिसरातील नागरिकांनी वआंबेडकरी अनुयायी व वंचित यांनी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले. त्या अनुषंगाने देवलाली कॅम्प परिसरातील आंबेडकरी अनुयायांच्या आक्रोश झाला.
हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष प्रथमेश संदीप चव्हाण मुख्य सूत्रधार पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सम्यक समाज बांधव देवळाली कॅम्प येथे देण्यात आली. काळाराम मंदिर परिसरा मध्ये महार,मांग,चांभार इत्यादी यांना पंचवटी परिसरात फिरू नाही तसेच तिथे कुठल्याही प्रकारचे निळे पिवळे झेंडे लावू नये तसेच काळाराम मंदिरात प्रवेश करू नये अशा प्रकारचे पत्र वाटण्यात आले. या घटनेमुळे पुरुष फुले शाहू आंबेडकर पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेलेली आहे अशा प्रकारच्या पत्रकामध्ये आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे सदरील पत्रक मानवता विरोधी असल्यामुळे हे पत्र प्रसिद्ध करून वसरीत करण्यावरून कठोर कारवाई
करावी या कृत्याचा तमाम आंबेडकर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करीत असून या धार्मिक सामाजिक तेढ वाढवणाऱ्या हिंदू युवा वाहिनीवर कायमस्वरूपी बंदी आणावी व कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची आपण याची आपण नोंद घ्यावी व संबंधितावर ऍट्रॉसिटा काय ॲट्रॉसिटी कायद्याने कायदेशीर कारवाई करण्यात यावी

नाशिक शहर प्रतिनिधी श्याम जाधव. प्रकाशपर्व न्युज चॅनल
RELATED ARTICLES

Most Popular