नाशिक. {प्रतिनिधी डॉ.अशोक पगारे}
दिनांक ८/२/२०२५ रोजी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष श्री चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता १० वीच्या विद्यार्थांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास सौ गीता पेंडसे (माजी शिक्षिका), सुशांत आंधळे (माजी विद्यार्थी )हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी मुख्याध्यापक श्री राजेंद्र कापसे ,उपमुख्याध्यापक श्री रविंद्र हात्ते, पर्यवेक्षक श्री सूर्यभान जगताप,पर्यवेक्षिका सौ मनिषा देशपांडे , शिक्षक प्रतिनिधी श्री बाळासाहेब आहेर, माता पालक संघ उपाध्यक्षा सौ गायत्री लचके , प्रमुख शिक्षक संघ सचिव सौ अरूणा साळुंखे,शालेय पंतप्रधान श्री आदित्य पाटील , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सौ.गीता पेंडसे यांनी यांनी नियमित अभ्यास करा, अपयशाने खचून न जाता जिद्दीने अभ्यास करा. पेपर लिहिताना वेळेचे नियोजन करा असा सल्ला दिला.तर माजी विद्यार्थी सुशांत आंधळे यांनी उत्तम यश मिळविण्यासाठी मेहनत करणे अनिवार्य आहे तसेच आपले जीवन यशस्वी करण्यासाठी योग्य करिअर निवडा असा मोलाचा सल्ला विद्यार्थांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री राजेंद्र कापसे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय जेष्ठ शिक्षक श्री दिलीप पवार,सौ.अंजली सुपे यांनी करून दिला. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.बाळासाहेब आहेर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.शालेय विद्यार्थी स्नेहा जाधव,संस्कृती बच्छाव,अथर्व ह्याळीज,प्रियंका थोरे,भूमिका पाटील,कल्याणी वाघ,जिया सोनवणे,रूपाली जाधव यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव सांगितले व शाळेबद्दल ऋण व्यक्त केले.
याप्रसंगी इयत्ता १० वीच्या विद्यार्थांकडून इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांकडे ज्ञानज्योत सोपविण्यात आली.संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष श्री.चंद्रशेखर मोंढे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.शालेय गीतमंचाने स्वागतगीत सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पुनम कुमावत यांनी केले तर आभार श्री हेमंत भुसारे यांनी मानले.याप्रसंगी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.