Homeप्रदेशज्ञानदा महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा…..

ज्ञानदा महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा…..

तिरोडा (वडेगाव) – मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी कवी कुसुमाग्रजांनी मोलाचे प्रयत्न केले.त्यामुळे त्यांच्या जयंतीचं औचित्य साधुन २७ फेब्रुवारीलाचं मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो.तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरवदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य छोटू देवपुरी यांच्याहस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य छोटू देवपुरी यांनी आपले विचार मांडले.ते म्हणाले की,संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणुस हा दिवस खूप उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो.हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारसाला उजाळा देण्याचा आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डाॅ. विजय रंगारी यांनी केले तर आभार डाॅ. अविनाश कांबळे यांनी मानले.डाॅ.एस.एच गौरखेडे,डाॅ.ए.एस वासनिक,डाॅ.आर.डी काटेखाये तसेच निरंजन जनबंधु,दिगंबर राऊत,चंद्रशेखर उपरीकर,रत्नदिप बडोले,सुमेध शहारे,छाया राऊत,प्रियंका गजभिये व ममता बडगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Most Popular