HomeE-Paperजीर्ण विद्युत खांबांचा धोका पंचाळी भागात खांब कोसळला; त्वरित कार्यवाहीची मागणी.

जीर्ण विद्युत खांबांचा धोका पंचाळी भागात खांब कोसळला; त्वरित कार्यवाहीची मागणी.

पालघर : पालघर जिल्ह्यात जीर्ण विद्युत खांबांचा धोका वाढला आहे. पालघर-बोईसर या रहदारीच्या मार्गावर पंचाळी गावाजवळील विद्युत खांब आज सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच परिसरातील चार ते पाच विद्युत खांब जीर्ण अवस्थेत असल्याबाबतची तक्रार सरपंच सुजाता पाटील यांनी अनेकदा केली; मात्र यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

पंचाळी ग्रामपंचायत हद्दीतील पंचाळी, आगवन, पंचाळी रमाई नगर येथील विद्युत खांब व विद्युत रोहित्र न्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. काही विजेचे खांच गंजलेले असून जीर्ण झाले आहेत. याबाबत पंचाळी ग्रामपंचायत सरपंच सुजाता पाटील यांनी उपविभागीय कार्यकारी अधिकारी अभियंता यांच्याकडे याबाबत अनेकदा तक्रार दाखल केली आहे. मात्र यावर अद्याप कोणतीही उपायोजना झालेली नाही. तसेच आज सकाळी याच भागात वर्दळीच्या रस्त्यावर जीर्ण विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती.

पंचाळी ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा आगवण येथे शाळेसमोरच विद्युत रोहित्र बसविले असून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने शाळेसमोरून रोहित्र हलविण्याची मागणीसुद्धा शाळेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र यावर देखील अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने महावितरण विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.

शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) या प्रकल्पातून पालघर जिल्ह्याला ८०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या योजनेतून जिल्ह्यातील नादुरुस्त खांब, केबल, विद्युत रोहित्र

पावसाळा सुरू झाल्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडतो. अशावेळी सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील हे खांब कोसळल्यास मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता आहे. – सुजाता पाटील, सरपंच

पंचाळी भागात दोन विद्युत खांब कोसळल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महावितरण अधिकारी घटनास्थळी विद्युत खांब बदलण्याचे काम करत आहेत जिल्ल्यातील अतियोकादायक असे विद्युत खांब रोहित्र, तारा यांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.- सुनील भारंबे, कार्यकारी अभियंता, पालघर


तसेच विद्युत संबंधी अनेक कामे निवडणुकीनंतर केली जाणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.


पालघर जिल्हा समन्वय, सिद्धेश जाधव, प्रकाशपर्व न्यूज

RELATED ARTICLES

Most Popular