इगतपुरी.खेड { प्रतिनिधी डॉ अशोक पगारे }
आज दिनांक ८/२/२०२५ रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.आजच्या बाल आनंद मेळाव्यात दिनानिमित्ताने इथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे या कार्यक्रमाचे आयोजन सन्माननीय मुख्याध्यापक श्री ठोकळ सर, श्री पोटकुळे सर, श्री वाजे सर, श्री झावरे सर शाळा व्यवस्थापन समितीचे आणि शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला.विविध खेळ स्पर्धा आणि संस्कृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा शाळा हीच केवळ शिक्षकांचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्व विकासासाठी एक व्यासपीठ आहे.आजच्या मेळाव्याचे आयोजन लिखित केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आनंद घेतला विविध उपक्रमात मध्ये सहभाग घेतला. नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी समस्त गावकरी खेड भैरव यांनी आपला विद्यार्थी घडावा यासाठी शिक्षकांच्या पालकांचे मोठा सव्वाशे एकत्र यावा यासाठी सिद्धार्थ गोकुळ वाजे, तृप्ती अर्जुन वाजे, आदित्य दिगंबर शिरसागर, अनन्या अरुण वाजे, श्रद्धा अशोक वाजे, रुद्र पंकज वाजे, श्रद्धा राजाराम वाजे, काव्य सुदाम वाजे, मुक्ता केशव कचरे, देव सुदाम वाजे व वेदिका संदीप खराटे या सदरील कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मोठा आनंद घेतला.पालक आणि शिक्षक यांना मिळून आनंद मिळवून देणारे खरे विद्यार्थी होय मुख्याध्यापक वर्गशिक्षक यांच्या या अथक परिश्रमामुळे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अगदी आनंदात पार पडला.यावेळी सर्वांचे मनःपुर्वक आभार व्यक्त करण्यात आले व अशाप्रकारे कार्यक्रम वारंवार आयोजित असायला पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांना विकासाची चालना मिळाली हीच सदिच्छा.