मंगळवार. दि.२३/०४/२०२४ तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष- श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर समर्थक डॉ.सुगत वाघमारे सर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली तसेच अण्णाभाऊ साठे क्रांती सेना गजानन तायडे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बोरकर व क्रांती सेनेची सर्व टीम – डॉ. सुगत वाघमारे सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे संपूर्ण जिल्हाभर गावा गावांमध्ये – निरंतरश्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या विजयासाठी मातंग समाजाच्या वस्त्यांमध्ये मोठ्या जोमाने प्रचार व प्रसार असताना दि.२३/०४/२०२४ रोजी- ग्राम सौंदाळा या ठिकाणी पारंपारिक रित्या मोठ्या प्रमाणात मरीआईची यात्रा असते.
सौंदाळा हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव तसेच मातंग समाजाची आराध्य दैवत समजल्या जाणारी मरीआई या ठिकाणी मातंग समाजाचे मोठ्या श्रद्धेने मोठ्या प्रमाणात राज्यभरातून मातंग बांधव येत असतात. अशा श्रद्धा असलेल्या सौंदाळा या गावातील मातंग भगिनींनी आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना विजयी करण्यासाठी, डफल्याच्या गजरात मरी आईला साखळे घातले. व या भागातील मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्या सौ.लक्ष्मी ताई वगारे यांच्या वतीने पूजन व प्रार्थना करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या विजयासाठी देवीच्या पुढे भावना व्यक्त केल्या- तसेच या ठिकाणी वरून तमाम मातंग बांधवांना व भगिनींना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेशर कुकर समोरील बटन क्रमांक ( ५ ) दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला.
एकंदरीत पाहता आकोला जिल्ह्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना जनतेने पुढील ५ वर्षासाठी निवडून देण्याचा संकल्प केला आहे. इतर पक्षाचा विचार केला तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बाजी मारणार असे वातावरण तयार झाले आहे.
सौंदाळा तालुका प्रतिनिधि, प्रकाशपर्व, न्यूज
saudala