काल दिनांक 5 एप्रिल 2024 ला गोंदिया जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने गोरेगाव तालुक्यातील आंबेडकर चळवळीचे नेते भार्गव वाघमारे व सहकारी यांचा वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विन भाऊ डोंगरे यांच्यामार्फत वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये पक्षप्रवेश करण्यात आला भार्गव वाघमारे यांच्या पक्षप्रवेशाने गोंदिया जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढेल अशी शक्यता दर्शविण्यात येत आहे. भार्गव वाघमारे हे आधीच वंचित बहुजन आघाडी मध्ये पदाधिकारी होते. त्यासोबतच त्यांचं आंबेडकर चळवडीमध्ये तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये खूप चांगलं कार्य आहे. त्यासोबतच त्यांचे बहुजन समाजाच्या इतर कार्यकर्त्यांसोबत पण चांगले संबंध आहेत यावरून असं वाटते की नक्कीच त्यांचे पक्षप्रवेशाने वंचित बहुजन युवा आघाडी हे अजून सातत्याने मोठ्या प्रमाणात कार्य करू शकेल.
तालुका समन्वयक विनोद रामटेकेप्रकाशपर्व न्युज