अजून किती लुटणार आहे आपल्याच आय बहिणीची अब्रू ,
स्वतंत्र पूर्व काळात हे असच घडत होत का?
आज देश स्वतंत्र होवून ७८ वर्ष झाली.
तरी माझी आय बहिण सुरक्षित नाही.
तिला घटनेत समानतेचा अधिकार दिला आहे.
तो कुठे आहे.
बोलतांना बोलतो आज आम्ही आय बहिण आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगत आहे.
हे खरं आहे का? आज तिला या पुरुष प्रधान जंगलात फिरताना रानटी जनावरांची शिकार व्हावं लागतं.
नारे बाजी अशीही होतें. बेटी बचाव बेटी पढाव
हे खरं आहे का?चूल आणि मुल हेच तिचं जीवन आहे का?
माझ्या सावित्रीमाईनी दिला आहे अधिकार तिला शिक्षणाचां.तोही तिला मिळू नये का?
गावाची सरपंच ते देशाची प्रधानमंत्री, राष्ट्रपती होण्याचा हक्क दिला आहे.
विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी , तरीही ती आज सुरक्षित नाही…. का?
तिने कोणत्याही क्षेत्रात तुमच्या पुढे चालू नये का?
तिची भर रस्त्यात नग्न धिंड काढली जाते, आज तिला जाळली जाते,
शरीराचे तिच्या लचके तोडले जातात, आज तिला भर रस्त्यात अमानूष मारहाण होतें पण,
आम्ही तिला वाचवण्यासाठी करत नाही, करतों फक्त, त्या घटनेचं चित्रीकरण,त्यात आम्ही धन्यता मानतो.
एकही पुरुष तिला वाचवण्याचा खोटा प्रयत्न सुध्दा करत नाही,
फक्त रात्रीच्या अंधारात त्याला कोणी पाहू नये म्हणून मेणबत्ती रॅलीत सहभाग दाखवतो,
तो कधी पेटणार, त्या मेणबत्ती सारखा आपल्या आय बहिणीला सुरक्षित करण्यासाठी……
शासनकर्ती जमात माझ्या आय बहिणीसाठी अनेक योजना राबवते पण,
असा कायदा कधी करणार, माझी आय बहिण कुठेही सुरक्षित असेल.
तिला खऱ्या अर्थाने जगण्याचा अधिकार मिळेल.खरचं असं होईल का..?
लेखक – मा.सुनिल काशिनाथ शेलार