Homeप्रदेशअकोला येथे बि.ई.एफ.चा कर्मचारी प्रबोधन मेळावा प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न

अकोला येथे बि.ई.एफ.चा कर्मचारी प्रबोधन मेळावा प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न

अकोला-
बहुजन एम्प्लाईजन फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे शनिवार दि.23 मार्च 24 रोजी अकोला येथे कर्मचारी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बि. ई. एफ. चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजकुमार जवादे हे होते सामाजिक नेत्या व विचारवंत मा. प्रा. अंजलीताई आंबेडकर या प्रमुख अतिथी व मार्गदर्शक होत्या. कार्यक्रमाचे उद्घघाटक भारतीय बौध्द महासभेचे अकोला जिल्हाध्यक्ष मा. पि.जे. वानखेडे यांचे हस्ते झाले स्वागताध्यक्ष मा़.सुधाकर वासे होते.
या प्रबोधन मेळाव्यात भारतीय संविधानाची वर्तमान स्थिती व आव्हाने तथा खाजगीकरण, बेरोजगार व कर्मचारींच्या समस्या त्यावरील उपाय या दोन विषयांवर बहुजन एम्प्लाईज फेडरेशन आँफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव मा.पि. एच.गवई,राष्ट्रीय संघटन सचिव मा. प्रा.डाँ. टि. डी. कोसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.प्रा. डाँ. चरणदास सोळंके, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा. शेषराव रोकडे,महासचिव प्रा.डाँ. रविकांत महिंदकर,राज्य सचिव सिध्दार्थ सुमन, संघटन सचिव सिद्धार्थ डोईफोडे,उपाध्यक्ष चैनदास भालाधरे,प्रा.डाँ.राजकुमार सोनेकर, यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजक राज्य सचिव नरेश मुर्ती, अकोला जिल्हा संघटन सचिव सुधाकर वासे हे होते.
कार्यक्रमास कर्मचारी,संघटित- असंघटीत कामगार,तथा संविधान प्रेमी जनता व लाभधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद इंगोले,अकोला जिल्हा समन्वयक,

RELATED ARTICLES

Most Popular