अकोला येथील आगर गावात भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या पवित्र ग्रंथाचे पठण अश्विनी पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा तीन महिने विश्वशांती बुध्दविहार आगर या ठिकाणी समारोपीय कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपासक उपासिकांची उपस्थिती होती व त्यानिमित्ताने भोजनदान देण्यात आले.अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम आगर या गावांमध्ये पार पडला या कार्यक्रमात संध्याकाळी प्रबोधन तथा भीमगितांचा सोहळा कार्यक्रम घेण्यात आला होता.यावेळी विश्वशांती क्रीडामंडळ सर्व गावकरी यांच्यावतिने कार्यक्रमात सम्राट अशोक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आकाश दादा सिरसाठ यांचे गावात गेल्याबद्दल व सामाजिक कार्यासाठी हारपुष्प शाल देऊन सर्व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी ते म्हणाले की,माझ्यासारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्त्याची दखल आगर या गावात घेण्यात आली त्याबद्दल सर्व अगर मधल्या गावकऱ्यांचे त्यांनी मनापासून धन्यवाद व्यक्त यावेळी केला.आंबेडकर चळवळीसाठी अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमातून निर्माण होतील असे ते यावेळी म्हणाले.त्या ठिकाणी झालेला विद्रोही भाषण,.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला रथ आज आपल्याला समोर नेण्याकरिता युवा पिढीने हा पुढाकार घेतला पाहिजे आणि बाबासाहेबांचं धम्मकार्य समोर नेण्याचा काम केलं पाहिजे.अनेक दलालांनी चळवळीला कलंक लावले तो कलंक आपल्याला मिटवायचा आहे असे ते यावेळी म्हणाले.
अकोला जिल्हा समन्वयक,शरद इंगोले, प्रकाशपर्व न्युज,+91-9689211382